प्रा.प्रविण कन्हेरे शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
केज प्रतिनिधी:
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र प्रा.डॉ.विश्वनाथराव कराड अध्यापक महाविद्यालय, केज येथे केंद्रसंयोजक म्हणून कार्यरत असलेले प्रा.प्रविण कन्हेरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सेट या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत शिक्षणशास्त्र या विषयातून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मा.श्री.विक्रमबप्पा मुंडे, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, देवगावचे सरपंच अतुलदादा मुंडे, केजचे गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे सर, प्राचार्या सौ.माधुरीताई मुंडे, प्राचार्य सचिन हांगे, प्राचार्य डॉ.किशोर मोरे, प्रा.व्यंकटराव घुले, प्राचार्य श्रीराम वायबसे, प्राचार्य अंगद मुंडे, प्राचार्य फैय्याज शेख व डॉ.विश्वनाथराव कराड शैक्षणिक संकुल, केज येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
