Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

संसाराची राख रांगोळी झालेल्या ऊसतोड कुटुंबाला राखेतून सावरण्यासाठी अनेकांचे हात सरसावले ! हिंदू-मुस्लिम ग्रुपने जमा केलेले सव्वा लाख रु. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते सय्यद कुटुंबाला मदत

By July 14, 2023No Comments3 Mins Read

संसाराची राख रांगोळी झालेल्या ऊसतोड कुटुंबाला राखेतून सावरण्यासाठी अनेकांचे हात सरसावले !

हिंदू-मुस्लिम ग्रुपने जमा केलेले सव्वा लाख रु. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते सय्यद कुटुंबाला मदत

गौतम बचुटे/केज :- दोन दिवसांवर मुलाचे लग्न आलेले असताना उसतोड मजुराच्या घरात लग्नाची लगबग सुरू असताना अचानक घराला लागलेल्या आगीत लग्नाचा बस्ता, दागिने, किराणा सामान आणि सर्व संसार जळून एका उघड्यावर पडलेल्या मुस्लिम कुटुंबाला गावकरी आणि अनेकांनी मदत करून जळून राख झालेल्या कुटुंबाला उभे राहण्यासाठी मदत केली. तसेच शेख जावेद यांच्या हिंदू मुस्लिम ग्रुपने जमा केलेले सव्वा लाख रु. सहाय्याक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते देण्यात आली.

या बाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान साळेगांव ता. केज येथील उसतोड मजूर सय्यद शफीक दगडू यांच्या पत्र्याच्या घराला आग लागली. त्यात त्यांनी त्यांचा मुलगा सय्यद रसूल शफीक यांच्या लग्नासाठी खरेदी केलेले कपडे, लग्नाचा बस्ता, नवरी मुलीसाठी खरेदी केलेले सोन्याचे दागिने, किराणा सामान आणि रोख रक्कम हे जळून खाक झाले. घराला आग लागल्या नंतर ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आणण्यात अपयश आले. आगीची माहिती केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, तहसीलदार अभिजित जगतात, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना माहीती मिळताच त्यांनी अग्निशामक विभागाला माहिती दिली. मात्र अग्निशामक दलाचीची गाडी पोहोचे पर्यंत घर आणि आतील सर्व सामान जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत घर आणि सर्व सामान जळून मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
रविवार दि. ९ जुलै रोजी त्यांचा मुलगा सय्यद रसूल याचे गेवराई तालुक्यातील तलवडा येथील मुलीशी मज्जीद मध्ये मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न पार पडला.
मात्र त्या नंतर सय्यद शफीक आणि त्यांचा नवविवाहित मुलगा व सून यांना राहण्यासाठी घर आणि खाण्या-पिण्याची कशी व्यवस्था करावी ही समस्या भेडसावत होती सय्यद कुटुंबाची ही अडचण माहीत होताच गावातून काही जणांनी धान्य, पीठ, मीठ, मिरची तेल असे किराणा साहित्य दिले. तर माजी आमदार पृथ्वीराज साठे, विष्णू घुले, नंदकिशोर मुंदडा, सरपंच कैलास जाधव, माजी उपसरपंच अमर मुळे, डॉ भालेराव आणि त्यांचे मित्र यांनीही मदत केली; परंतु सय्यद कुटुंबाचा आगीच्या राख रांगोळीत भस्म झालेला संसारातून उघड्यावर आलेला संसार सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने सरगम बँजो पार्टीचे मास्टर जावेद शेख आणि त्यांचे मित्र रत्नाकर राऊत, शेख मुन्ना यांनी सुमारे सव्वा लाख रु. रोख रक्कम जमा केली.

शेख जावेद यांनी जमा केलेली मदत सव्वा लाख रु. गुरुवार दि. १३ जुलै रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते सय्यद शफीक यांचे नवविवाहित रसूल याकडे सोपविण्यात आले. यावेळी पत्रकार गौतम बचुटे, शेख इलाही, सोनू बचुटे, रत्नाकर राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकशेषेराव यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या मदतीमुळे आगीत संसार मोडून पडलेले सय्यद कुटुंब भावुक झाले तर सर्वांच्या मदतीमुळे सय्यद कुटुंबाला आगीच्या राखेतून संसार सावरण्यासाठी मदत होणार आहे.

——————————————————————
” सय्यद कुटुंबाला अनेकांनी केलेल्या मदतीमुळे त्यांचा संसार उभा राहण्यास मदत होईल आणि त्यासाठी अनेक ज्ञात अज्ञातांनी जी मदत केली ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत.”

—– पंकज कुमावत,
( सहाय्यक पोलीस अधीक्षक )
——————————————————————–” सरगम बँजो पार्टीच्या माध्यमातून माझे अनेक ठिकाणी मित्र आहेत त्या सर्वांचा मी हिंदू मुस्लिम ग्रुप नावाचा एक व्हाट्स अप ग्रुप केला त्यातून मी सय्यद कुटुंबाच्या मदतीसाठी आवाहन करताच अनेकांनी मदत केली. ”
—— मास्टर शेख जावेद
—————————————————————–
” माझ्या कुटूंबावर जे संकट आले त्यातून सावरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा मी ऋणी असून मला त्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही.”
——- सय्यद रसूल

Post Views: 13

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 0 4
Total Users : 146004
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.