श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
आडस-
आडस येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला गुरु शिष्याची परंपरा इतिहास काळापासून सुरू आहे गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथे हा कार्यक्रम आनंदात पार पडला , या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भारतराव सोळंके सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री आकुसकर श्रीकिसन , श्री देशमुख आर.एम.श्री पवार जे.बी ,श्री मगर एच.एन. श्रीमती वाघमारे मॅडम , श्रीमती पुरी मॅडम , यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते .
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये प्रामुख्याने तेजस्विनी पोटभरे आणि श्रावस्ती वाघमारे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत मधून गुरु विषयी आदर व्यक्त करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या , त्याचबरोबर श्री कोकाटे बी.यु. ,श्री बिडवई पी.व्ही. व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भारतराव सोळंके सर यांनी आपल्या मनोगत मधून इतिहासातील दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षक श्री शिनगारे एस.बी. सर यांनी केले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी सहकार्य केले .
