केज मध्ये छोट्या व्यावसायिकांचा “आम्हाला जागा द्या” म्हणून मोर्चा
गौतम बचुटे/केज :-
* दि. ३ जून रोजी केज संघर्ष समितीच्या वतीने प्रा. हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
* केज मधील अतिक्रमणे हटविल्यामुळे छोट्या व्यावसायिक व त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहेत.
* त्यांना उपजीविकेचे अन्य साधन उरलेली नाहीत.
* त्यासाठी सरकारी जागेत गाळे बांधकाम करून ते भाडे तत्वावर या छोट्या व्यापाऱ्यांना द्यावेत. ही मागणी मोर्चे कऱ्यांची केली.
*मोर्चेकऱ्यांचे निवेदन नायब तहसीलदार लक्ष्मण धस आणि गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी स्वीकारले.
या मोर्चात छोटे छोटे व्यवसाय करणारे महीला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
