अंबा सहकारी साखर कारखानाच्या चेअरमनपदी रमेशराव आडसकर
अंबाजोगाई-
आंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये रमेशराव आडसकर यांची चेअरमन म्हणून निवड झाली तर दत्ता आबा पाटील यांची व्हाईस चेअरमनपदावर निवड झाली आहे. रमेशराव आडसकर यांच्या निवडीबद्दल केजमधे तोफा वाजवून आडसकर समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.
