विषारी सर्पाने दंश केलेल्या व्यक्तीवर केज उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार
सर्पदंशावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार उपलब्ध
डॉ. संजय राऊत, अधिक्षक
केज –
दि.३० रोजी सकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे कळंब तालुक्यातील भोगजी गावातील शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा आडसुळ वय ४५ वर्ष हे आपल्या शेतातील जनावरांना भुस्कट टाकीत असतानां आचानक त्यांच्या हाताला क्रोबा जातीच्या सापाने दंश केला त्यांनी न घाबरता आरडा ओरडा करून आसपासचे माणसे जमविले व प्रथम त्या सापला मारले व तो साप सोबत घेऊन तात्काळ उपचारासाठी कळंब या ठिकाणी डिकले हॉस्पीटल येथे ७ वाजाता दाखल केले व तेथील डॉ डिकले यांना प्रथम उपचार करून अंबाजोगाई येथे रेफर केले पंरतू आडसुळ यांचे चुलत भाऊ बालाजी आडसुळ यांनी माळेगांव ते लोखंडी रस्ता खराब असल्यामुळे केज मार्गे ते अंबाजोगाई कडे निघाले पण केज मधुन जात असताना त्यांचे सलाईन संपले व त्यांनी थेट सकाळी ८ वाजता केज उपजिल्हा रुग्णालय गाठले त्या वेळेस तेथे हजर असलेले डॉक्टर सुरज कोठावळे , अयेशा शेख , या
डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. प्रथम रूग्णाला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला दोन तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले व पंढरीनाथ आडसुळ यांना जीवदान देण्यात यश आले व डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला यावेळी डॉ संजय राऊत , सुरज कोठावळे , अयेशा शेख, सिस्टर गजभार कावेरी , ठोंबरे शोभा यांनी अथक परिश्रम घेतले त्या बदल आडसुळ परिवाराने सर्व डॉक्टरांचे आभार मानले व आज केज उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आमच्या साठी देवदूतच ठरले अशी भावाना बालाजी आडसूळ यांनी व्यक्त केली
केज उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ संजय राऊत यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, केज उपजिल्हा रुग्णालयात कुठल्याही जातीचा साप , नाग, धामण परड , क्रोबा विवीध प्रकराचे विषारी सापाच्या विषावर पुर्ण उपचार सुविधा उपलब्ध आहे.
