शिंदी येथे शेतकरी महिला सन्मान दिन साजरा
केज- हनुमंत सौदागर–
कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी सागर पठाडे यांच्या वतीने तालुक्यातील विविध गावामध्ये कृषी संजीवनी सप्ताह दिनांक 25 जून ते 1जुलै दरम्यान कृषी विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून शेतकरी महिला सन्मान दिन शिंधी येथे साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत मुग पीक प्रात्यक्षिक बियाण्याचे वाटप आत्मा अंतर्गत स्थापित जिजाऊ महिला शेतकरी गटातील महिलांना करण्यात आले. शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला सुभाष शेडगे कृषि पर्यवेक्षक यांनी बीज प्रक्रिया, घरचे बियाणे वापरणे, कष्टातून सन्मान होईल या पद्धतीने शेतीमध्ये तंत्र वापरून नियोजन करून पीक उत्पादनात कशी वाढ होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले. प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग नावीन्य पूर्ण, प्रयोग करणाऱ्या महिलांचे स्वागत करून,केलेल्या प्रयोगाची उपस्थित महिलांमध्ये विचारांची देवाणघेवाण करून ,त्यावर आपलं मत मांडून त्याला एक विशिष्ट वळण देऊन भविष्यात काय करता येईल या बाबत कृषि सहाय्यक संजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सरपंच प्रियंका सुशील जाधव,कृषि पर्यवेक्षक सुभाष शेडगे,उद्यान पंडित रमेश सिरसाट संजय गायकवाड श्रीमती शिंदे सी एन कृषि सहाय्यक, योगेश पाटील बीटी एम आत्मा, किशोर फरकांडे, ज्ञानेश्वर जाधव कृषि सहाय्यक ,सुकेशिनी बाजीराव जाधव सुलभा वसंत जाधव,सुंनदा अर्जुन जाधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
