गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी साजरी
नांदेड-

शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा अहिल्यादेवी होळकर नगरी खंडोबा चौक तरोडा बु नांदेड येथे आषाढी एकादशीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता त्यात त्यांनी पंढरपूरचे देवस्थान विठ्ठल आणि रुक्माई च्या वेशभूषेत तसेच वारकर्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांनी फुगडी, रिंगण, टाळ मृदंगासह यांचा आनंद लुटला. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी एकादशीच्या दिंडीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.