केज तालुक्यातील घरांच्या पडझडीचे अनुदान कधी मिळणार?
तहसील पंचायत समितीच्या कात्रीत अनुदान अडकले
केज दि २७(प्रतिनिधी)
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते घराच्या भिंती कोसळून अन्नधान्य,संसाउपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते.अनेकांचे संसार उघड्यावर आले होते
गावातील घरांची पडझडीचे महसूल विभागाने व जिल्हा परिषद विभागाने पंचनामे केले त्याच्या नोंदी घेऊन घेतल्या. त्यासाठी अनुदान निधी मंजूर झाला. आठ महिने होऊन गेले मात्र नुकसानग्रस्तांना कवडीही मिळाली नाही. निधी मंजूर आहे मात्र तो कुणी आणि कसा वाटप करायचा या तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या कात्रीत मदत अनुदान अडकून पडलेले आहे. नुकसानग्रस्तांना पडझडीचे अनुदान तात्काळ वाटप करावी अशी मागणी केली जात आहे
तलाठी यांनी महसूल विभागाला पंचनामे सादर केल्यानंतर निधी मंजूर करण्यात आला.त्यानंतर ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्तांचे पिटीआर ,आधार कार्ड बँक पासबुक अदि कागतपत्रे घेतली अनुदान लाभार्त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही त्यांना धनादेशही मिळालेले नाहीत.
———————–
तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय यांच्यामधील पत्रव्यवहार आणि नियोजनाचा ताळमेळ नसल्याने अनुदान वाटप रखडलेले आहे.
————————-
दोन्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे नुकसानग्रस्तांच्या हातावर दमडीही आलेली नाही.तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी समन्वय करून लाभार्थींना तात्काळ अनुदान वितरित करावे अशी मागणी नुकसानग्रस्तांमधून होत आहे.