Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

व्यापारी जागेसाठी भव्य मोर्चाचे आयोजन : उद्या बैठक

By June 26, 2023No Comments2 Mins Read

व्यापारी जागेसाठी भव्य मोर्चाचे आयोजन :
उद्या बैठक

केज:
केज शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविल्यानंतर छोटे व्यापारी व टपरिधारक व्यवसायिक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असणारे व्यवसायिक व कुटुंबीय यांची प्रचंड उपासमार सुरू झाली आहे. आता या व्यवसायिकांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. केज नगरपंच्यायत कडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. केजमध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा मुख्य रस्त्यालगत केवळ शासकीय विविध कार्यालयाच्या जागा आहेत. या शासकीय जागेवर रस्त्यालगत नियम व अटी अंतर्गत गाळे काढून या व्यापाऱ्यांना शासकीय कायदे व नियमाच्या अधीन राहून हे गाळे किरायाने दिल्यास व्यवसायिकांची गरजही भागेल व शासनाला आर्थिक प्राप्तीही होईल. यासाठी केज विकास संघर्ष समितीने अगदी पहिल्याच दिवशी केज पंच्यायत समितीकडे गाळे बांधण्यासाठी मागणी केली आहे. याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. शासनाने “बांधा-वापरा- हस्तांतरीत” करा या धोरणाचा अवलंब केला आहे. याची केजला खूप गरज आहे. या प्रस्तावाला गती देऊन येत्या सहा महिन्यात हे गाळे तयार व्हावेत व व्यावसायिकांना उपलब्ध करावेत या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने येत्या शुक्रवार दि 30 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य मोर्च्याचे आयोजन करत आहोत. शासनाला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी या मोर्च्यात केज शहरातील छोटे व्यापारी, टपरिधारक व अतिक्रमण उठल्यामुळे रस्त्यावर आलेले दुकानदार व त्यांच्या कुटुंबातील लोकांनी तसेच समाजप्रेमी नागरिकांनी फार मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले व नासेर मुंडे यांनी केले आहे.
या मोर्च्याच्या तयारीसाठी विशेष बैठक मंगळवार दि 27 जून रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह केज येथे आयोजित केलेली असून जास्तीत जास्त लोकांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 12

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.