केज उपजिल्हा रुग्णालयात १३ वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यु ;
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा मुलीच्या पालकांचा आरोप
केज-
केज उपजिल्हा रुग्णालयात एका १३ वर्षाच्या मुलींचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्या प्रकरणी पालकांच्या वतीने उपचारात हालगर्जीपणा करणार्या डॉक्टर कर्मचा-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
या बाबत माहिती अशी कि केज शहरातील अल्लाउद्दीन नगर येथे वास्तव्यास असणारे सिरसट कुटुंब त्यांना सोनाली, मोनिका , मेघना , मेघराज व रुद्र अशी तीन मुली व दोन मुले असुन १३ वर्षाची नालंदा विद्यालयात ७ वी च्या वर्गात शिकणारी मुलगी सोनाली सतीश सिरसट हिला दि २३ जुन रोजी रात्री ०३ वाजता उलटी , जुलाब व पोटदु:खी मुळे दि २४ जुन रोजी सकाळी तिची आई शितल सतीश सिरसट यांनी तिला उपजिल्हा रुग्णालय केज येथे सकाळी ०९ वाजता दाखल केले. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले दरम्यान दुपारी ०३ वाजता तिचा मृत्यु झाला असुन उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वा इतर कर्मचारी यांनी वेळेवर लक्ष न दिल्यामुळे त्यांच्या हालगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा मुत्यु झाला असल्याचा आरोप आई- वडिलांनी करत माझ्या मुलीवर ज्या डॉक्टर व नर्स यांनी उपचार केला आहे त्यांची नावे तसेच तिच्यावर केलेल्या उपचारांची माहिती त्या बरोबरच डॉक्टर व तेथील कर्मचारी यांच्या कडुन उपचारात निष्काळजीपणा व हालगर्जीपणा झाल्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रार निवेदनाव्दारे उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. राउत , जिल्हा शल्य चिकीत्सक , जिल्हा अधिकारी बीड , पोलिस अधिक्षक उपविभाग केज , पोलिस निरीक्षक पो. ठाणे केज यांच्याकडे केली असुन नंतरच शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली. या दरम्यान दलित आन्याय आत्याचार निर्मुलन समिती केजच्या पदाधिकारी यांनी पालकांना सोबत घेऊन पाठपुरावा केला.
