केज तालुक्यात काही भागात पाऊस बरसला
उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा
केज-
मानसून बदलामुळे
जुन महीना संपत आला तरी पाऊस काही पडत नसल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते तर शेतकरी पेरणी करण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
आज दि. २४ रोजी दुपारी ५:३० च्या सुमारास केज सह तालुक्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तर शेतकरी वर्गातून पावसाच्या आगमनाचे समाधान दिसत आहे.
विविध हवामान खात्याच्या अंदाजानं यावेळी मानसून बदलामुळे पाऊस उशिरा पडणार आहे. त्यामुळे शेतकरी यांनी पेरणीसाठी घाई न करता योग्य मार्गदर्शन घेऊन पेरणी करावी असे हवामान खात्यातील तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
