अतिक्रमणा विरुद्ध प्रशासन सोमवार पासून पुन्हा ॲक्शन मोडवर
केज-
शुक्रवार दि. १६ रोजी प्रशासनाने केज शहरातील बीड- अंबाजोगाई रोड, उमरी रस्ता, सराफ लाईन, मंगळवार पेठ, कळंब रोड व शासकीय कार्यालये परिसरातील अतिक्रमण जमिनदोस्त केली होती. यात सर्व प्रशासकीय, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त पणे कारवाईत सहभाग घेतला होता. शनिवार आणि रविवार उसंत घेऊन पुन्हा शहरातील उर्वरीत अतिक्रमण विरुद्ध सोमवार पासून पुन्हा कारवाई करण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याचे समजते. त्यामुळे शहरातील कोणकोणत्या मार्गावर ही कारवाई करण्यात येणार हे नक्की माहिती नसल्यामुळे अतिक्रमण धारक धास्तावले आहेत.
