केज मधील अतिक्रमणावर अखेर पडला हातोडा !


स्वतः पंकज कुमावत तहसीलदार, गटविकास अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, मुख्याधिकारी आणि फौजफाटा रस्त्यावर अतिक्रणावर फिरविला बुलडोझर !
गौतम बचुटे/केज :- दि. १६ जून रोजी सकाळी ९:०० पासून केज शहरातील अतिक्रमणे हटविण्यात सुरुवात झाली. यावेळी स्वतः साहाय्यक पोलीस अधीक्षकपंकज कुमावत तहसीलदार, गटविकास अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, मुख्याधिकारी विविध विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचा फौजफाटा यांच्या बंदोबस्तात केज शहर आणि सरकारी कार्यालये व महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली.
केज शहरातील महामार्ग, सरकारी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी झालेले बेकायदेशीर अतिक्रमणे ही दि १६ जून रोजी सकाळी ९:०० वाजल्या पासून हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली. या वेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वतः पंकज कुमावत तहसीलदार, गटविकास अधिकारी मोराळे, विभागीय कृषी अधिकारी, मुख्याधिकारी गायकवाड, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार आणि फौजफाटा रस्त्यावर उतरून अतिक्रणावर बुलडोझर फिरविला. केज शहारातून जाणारे महामार्ग तसेच तहसील कार्यालय, पंचायत , कृषि अधिकारी कार्यालय तसेच मंगळवार पेठ येथील अतिक्रमणे येथील सुमारे २०० ते २५० अतिक्रमणावर बुलडोझर फिरवून अतिक्रमणे काढण्यात आली.
————————————-
प्रचंड पोलीस बंदोबस्त :- अतिक्रमण हटाव मोहित केज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, युसुफवडगाव आणि धारूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह दंगल नियंत्रण पथक यांचा बंदोबस्त होता.
—————
अनेकांचे संसार उघड्यावर :- या अतिक्रमण हटावमुळे टपरी चालक, हॉटेल, झर्रॉक्स, फळ विक्रेते, चहाच्याव टपऱ्या, गॅरेज असा व्यवसाय करणारे यांचा संसार उघड्यावर आले आहेत.
————
अनेकांना अश्रू अनावर झाले :- रस्त्याच्या कडेला काही भटक्या प्रवर्गातील लोकांनी पत्र्याचे शेड उभारून राहात होते. त्यांचा निवारा उध्वस्त झाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
——————-
काही अतिक्रमणे जैसे थे ! :- तहसील कार्यालय आणि कळंब चौक व कानडी चौकातील काही अतिक्रमण धारकांकडे न्यायालयाचा मनाई आदेश असल्यामुळे पुढील आदेशा पर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासन त्याला आवाहन देणार आहे.
————-
लोकप्रतिनिधींनी उद्घाटने केलेले दुकाने सुद्दा पाडली :- केज शहारातील अनेक व्यवसायांची उदघाटने ही लोकप्रतिनिधी च्या हस्ते झाली होती त्याला लोकप्रतिनिधी वाचवू शकले नाहीत.
————
लोकप्रतिनिधी आणि पुढारी भूमिगत :- अतिक्रमण हटाव सुरू असताना लोकप्रतिनिधी मात्र कोणीही दिसले नाहीत.
————–
शहरात अंधार ! :- अतिक्रमण हटविताना दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत प्रवाह बंद केला असल्याने व अनेकांचा विद्युत पुरवठा तोडवा लागल्याने आजची रात्र केजवासीयांना अंधारात काढावी लागणार.
———————-
रात्री ८:०० वा. पर्यंतही अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरूच :- सकाळी ९:०० वा. सुरू झालेली अतिक्रमण हटाव मोहीम रात्री ८:०० वा. पर्यंतही सुरू आहे.