येडेश्वरी साखर कारखान्याचा प्रती टन ऊस बिल दुसरा हप्ता रु.100/- प्रमाणे बँक खात्यात वर्ग !
केज-
आज केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याने गुरुवार दिनांक 15 जून 2023 रोजी ऊस बिल दुसरा हप्ता रू.100/- प्रती टन प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
येडेश्वरी कारखाना हा तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून वाटचाल करीत आहे.
गत हंगामात तालुक्यात अतिरिक्त ऊस असल्याने आपला ऊस शिल्लक राहतो की काय ? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप करून कारखाना बंद केला. कारखान्याने सर्वाधिक भाव दिला असून यापुढे ही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखाना यशस्वीरित्या चालवला जाईल, असे येडेश्वरी साखर कारखाना चेअरमन बजरंग सोनवणे यांनी सांगितले.आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने सन २०२२-२३ च्या नवव्या गळीत हंगामात उसाला २४५० रुपये भाव देत चेअरमन बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे. कारखान्याने यापूर्वी २४५०रुपयांचा पहिला हप्ता दिला होता. १५जुन रोजी प्रती टन शंभर रुपयांचा हप्ता ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.
