केजमधील अतिक्रमण धारकांना प्रशासनाचा इशारा
केज-
केज मधील शासकीय जागा व शासकीय कार्यालये परिसरातील वर्षानुवर्षे बसलेल्या अतिक्रमण धारकांना केज तालुका प्रशासनाच्या वतीने दि. १५ जुन पर्यंत आपले अतिक्रमण काढून घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दि. १६ पासून अतिक्रमण धारकावंर प्रशासन हातोडा चालवणार आहे.
काल दि. १२ रोजी केज तालुक्यातील सर्व प्रशासकीय, शासकीय अधिकारी यांची बैठक झाली असून यात हा निर्णय घेतला आहे.
अतिक्रमण उठवल्यास मात्र अनेकांच्या उपजिवीकांचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने तालुक्यातील राजकीय मंडळींनी अनेक वेळा व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे. तो प्रश्न आता पुढे येण्याची शक्यता आहे.
