Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

ह.भ.प.वै. महंत रामदास बाबा पायी दिंडी व पालखी सोहळा!! श्री क्षेत्र डोंगरेश्वर संस्थान ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा.

By June 12, 2023No Comments2 Mins Read

ह.भ.प.वै. महंत रामदास बाबा पायी दिंडी व पालखी सोहळा!!

श्री क्षेत्र डोंगरेश्वर संस्थान ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा.

वडवणी : दत्ता कराड

श्री क्षेत्र डोंगरेश्वर संस्थान येथील रामदास बाबा पालखी सोहळा. पायी दिंडी सोहळा डोंगरेश्वर संस्थान ते पंढरपूर यादरम्यान असलेल्या या पायी दिंडीचे प्रस्थान शनिवार दि.१७ जून २०२३ रोजी होणार आहे . या पायी दिंडीचे आयोजन ह.भ.प.वै महंत रामदास बाबा यांच्या कुशल नेतृत्वाखाली व सद्गुरु भगवान बाबा, वामन भाऊ, भिमसिंह बाबा, काशीगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून होत आहे.या डोंगरेश्वर संस्थान ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन ह.भ.प. महंत पांडुरंग महाराज शास्त्री यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आषाढी एकादशी जवळ आली की, पांडुरंगाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागते. वर्षभर काबाडकष्ट करणारा ग्रामीण भागात राहणारा शेतकरी, कष्टकरी, वारकरी संप्रदाय जपणारा प्रत्येक भक्त पंढरीच्या पायी वारीत सहभागी होतो, व पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाने जीवन तृप्त झाल्याचा परमानंद त्याला मिळत असतो. बीड जिल्ह्यातील डोंगरेश्वर संस्थान येथील ह.भ.प.वै महंत रामदास बाबा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून रामदास बाबा पालखी सोहळा पायी दिंडी श्री क्षेत्र डोंगरेश्वर संस्थान ते पंढरपूर अशी काढण्यात येते. ही पायीदिंडी व पालखी सोहळा भाविक भक्तांचा या पायी दिंडी सोहळ्याला दरवर्षी उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच ब्राह्मणगाव, मूर्ती, भीमसिंह गड वडवणी, तांदळवाडी ,येथील दिंड्या श्री क्षेत्र डोंगरेश्वर संस्थान पायी दिंडी सोहळ्यात सामील होतील. या सोहळ्या दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. दररोज भाविक पायी दिंडी सोहळ्याला जेवणाच्या पंगती देऊन अन्नदानाचा महायज्ञ सुरू असतो. या वर्षी हा पालखी सोहळा प्रस्थान दि.१७ जून २०२३ शनिवार रोजी होणार असून याची सांगता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दि. २७ जून २०२३ मंगळवार रोजी होणार आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दिंडी थांबण्याचे ठिकाण वै. महंत रामदास बाबा मठ शेगाव ( दु ) रोड पाण्याच्या टाकीजवळ, पंढरपूर येथे ही दिंडी थांबणार आहे. व श्रीक्षेत्र पंढरपूर मध्ये पौर्णिमेपर्यंत दिंडी थांबेल. व पौर्णिमेला काला करून परतीचा प्रवास सुरू होईल. आणि श्रीक्षेत्र डोंगरेश्वर संस्थान देवदरा करंजवण येथे दिंडीची सांगता होईल. या पायी दिंडी सोहळ्यात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ह.भ.प. महंत पांडुरंग महाराज शास्त्री यांनी केले आहे.

Post Views: 20

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.