बिबट्या सद्रश्य भागात वनविभागाने केली पाहणी
वनविभाग पथकाने दिल्या काही मार्गदर्शक सुचणा
केज-
शुक्रवारी सकाळी त्र्यंबक लांडगे यांच्या आंबेराईत सुरज पाटोळे या युवकास बिबट्या दिसला होता. त्या पार्श्वभूमीवर वन विभागाचे पथक आज शनिवारी बोरगावात येथे दाखल झाले होते. यावेळी बोरगावचे सरपंच बाळासाहेब गव्हाणे, उपसरपंच, जालिंदर गव्हाणे, हे उपस्थित होते. वनरक्षक आर एस सोनकांबळे साहेब यांनी यावेळी वन्य हिंस्र प्राण्यांविषयी माहिती सांगीतली. तसेच त्यांच्यापासून बचाव कसा करायचा याच्या मार्गदर्शनपर सुचनाही दिल्या.
त्यानंतर वनविभागाचे पथक भोपला या गावी गेले व तेथून हे पथक गाडेमोडी शिवारात आले. बोरगाव, भोपला, खोंदला, आथर्डी या गावांचा संयुक्त शिवारास गाडेमोडी हे नाव आहे. गाडेमोडी शिवारात सुरज पाटोळे या युवकाने बिबट्या दिसला होता. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना नेऊन सुरजने सर्व हकीगत सांगीतली. बिबट्या असलेले कोणतेही ठळक पुरावे यावेळी वनविभागाच्या हाती लागले नाहीत. यावेळी वनरक्षक सोनकांबळे साहेब, वनमजूर भालेराव, भोपला गावचे सरपंच विजयसिंह जाधव तसेच बोरगाव ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा सेवक श्रीराम वळेकर तसेच बोरगाव, भोपला, खोंदला येथील युवक पथकासोबत उपस्थित होते.
शेवटी वनरक्षक सोनकांबळे साहेब यांनी पुढील काही मार्गदर्शक सुचना दिल्या. पशुधन असणारे प्राणी यांचे काही शिकारीची घटना घडली तर तात्काळ वनविभागास कळवण्यास सांगून गावकऱ्यांचा निरोप घेतला.
यावेळी वनविभागाचे शंकर वरवडे, चिकटे साहेब, सोनकांबळे साहेब, पत्रकार गौतम बचुटे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
