अवघड शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून काढला दिड किलोचा गोळा
अंबाजोगाई-
अंबाजोगाई शहर परिसरातील लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात गर्भाशयाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील जाधव, डॉ. अरुणा दहिफळे (केंद्रे) व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सायमा खान यांनी पार पाडली.
रुग्ण महिलेच्या पोटात अनेक दिवसापासून दीड किलोचा गोळा होता. तो गोळा शरीरातील इतर अवयवांशी चिटकलेला होता. त्यामुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. भूलतज्ज्ञ डॉ. वैशाली पोतदार यांनी प्रयत्नांची
पराकाष्ठा करून शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रिया यशस्वितेसाठी इन्चार्ज संगीता शिंदे, नर्स मीरा मुंडे यांनी परिश्रम घेतले. यापूर्वीही अशाच
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आमच्या टीमने केलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचवण्यात यश मिळाले असून स्त्री रुग्णालयातील मिळणाऱ्या सुविधांचा गरजू रुग्णांना लाभ होईल, असे डॉ. अरुणा दहिफळे (केंद्रे) यांनी सांगितले.
