Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

प्रांजली मुंडेंचा मुंडे वाडी येथे भव्य नागरी सत्कार संपन्न; माझे यश आईला समर्पित- प्रांजली मुंडे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

By June 6, 2023No Comments2 Mins Read

प्रांजली मुंडेंचा मुंडे वाडी येथे भव्य नागरी सत्कार संपन्न;

माझे यश आईला समर्पित-
प्रांजली मुंडे

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

केज –
तालुक्यातील मुंडेवाडी येथील अतिशय छोट्याशा गावातून आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर प्रांजली मुंडे हिने यशाला गवसणी घातली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ती मुख्याधिकारी पदावर विराजमान झाली आहे. प्रांजलीचे कौतुक करण्यासाठी मुंडेवाडी गावामध्ये युवा उद्योजक सुनील घोळवे यांच्या पुढाकारातून प्रांजलीच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा त्याचबरोबर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा केजचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार सचिन देशपांडे गटविकास अधिकारी राजेश मोराळे, भाजपा ता. अ. भगवान केदार, कृ.उ.बा.स.उपाध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर, महादेव सुर्यवंशी, पत्रकार गोविंद शेळके तसेच गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रांजली मुंडे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आणि प्रांजलीच्या आईनेही प्रांजलीचे वडिलांचे छत्र बालवयातच हरवलेले असतानाही हार न मानता आपल्या दोन्हीही मुलींना उच्च शिक्षण दिले. आणि प्रांजलीनेही आईच्या कष्टाचे चीज करत एमपीएससीच्या माध्यमातून मुख्याधिकारी पदापर्यंत मजल मारली. आणि तिचे कौतुक गावात व्हावे या उद्देशाने सोमवारी सायंकाळी प्रांजलीच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अख्खे गाव गोळा झाले आणि आपल्या लेकीचे भरभरून कौतुक केले.
यावेळी आमदार नमिता मुंदडा यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर प्रांजलीनेही सत्काराला उत्तर देताना कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला उच्च पदापर्यंत जायचे असेल तर अभ्यासामध्ये नियमितता आणि जिद्द असेल तर ते साध्य होते असा विश्वास व्यक्त केला. आणि आपल्या यशाचे श्रेय तिने आईला समर्पित केले. यावेळी गावातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण गावाला स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

Post Views: 15

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 6
Total Users : 146046
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.