अहिल्यादेवी होळकर जयंती निम्मित आरोग्य शिबीर संपन्न;
मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांचा समाज उपयोगी उपक्रम
केज तालुक्यातील माळेवाडी येथे मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरास राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ तांबडे साहेब,नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नागरगोजे मॅडम आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी,मोफत औषधोपचार व रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. महिला ,पुरुष व जेष्ट नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
या वेळी मनसे माळेवाडी चे शाखा अध्यक्ष गोविंद हाके,ग्रामपंचायत सदस्य गोपाळ हाके,अशोक शिंदे, गोविंद हाके,रामेश्वर हाके,कृष्णा कळसकर,श्रीकांत वाघमोडे, श्रीकांत शिंदे आदींसह गावातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
