राधिका बजाज (लोहिया) यांना पीएचडी प्रदान
अंबाजोगाई प्रतिनिधी :
येथील सौ. राधिका सुरज बजाज (लोहिया) यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील वाणिज्य विभागात पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. रेश्मा डोईफोडे, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आॕन लाइन खरेदी संदर्भात विशेषत: नांदेड जिल्ह्यातील ग्राहकांच्या प्रवृत्तीचा अभ्यास या विषयावर संशोधनाचे कार्य पूर्ण केले.
राधिका सुरज बजाज यांनी यापूर्वी एमफील, जीडीसीए व सेट परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. तसेच त्यांनी नांदेड येथील यशवंत महाविद्यालय, पिपल्स महाविद्यालयात व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले आहे. यासाठी त्यांना त्यांचे सासरे बालाप्रसाद बजाज व वडिल राजकुमार लोहिया यांचे पाठबळ लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
