केज शहरात महेश नवमी उत्साहात साजरी
केज –
केज शहरात महेश नवमी चे आवचित्य साधुन केज तालुका माहेश्वरी सभा यांनी दि.२८/५/२०२३ रोजी रक्तदान शिबीर हनुमान मंदीर, वकीलवाडी केज येथे आयोजीत केले होते त्यात महीला मंडळ व माहेश्वरी युवा प्रगती यांनी स्वयं: फूर्त पणे एकतीस जणांनी रक्तदान केले
महेश नवमी दि. २९/५/2023 रोजी हनुमान मंदीर वकील वाडी येथे सकाळी ७ वा ३० वाजता महेश पुजन हे माहेश्वरी समाजाचे बीड जिल्हा उपअध्यक्ष ओमप्रकाशजी भुतडा यांच्या हस्ते संपन्न झाले
त्यानंतर केज शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभयात्रा ढोल ताश्याच्या गजरात वकीलवाडी कानडी रोड, मेनरोड, मंगळवार पेठ ते बालाजी मंदीर येथे सांगता शोभ यात्रेत महिला व पुरूष मोठ्या संख्यने सहभागी झाले होते बालाजी मंदीर याठिकाणी आरती, व रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्याचे उद्घाटन डॉ. सौ. शुभदा
लोहीया यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ सौ शुभदा लोहिया यांचे ‘आरोग्यमयी आनंदमयी जिवन’ या विषया वर मार्गदर्शन झाले. व जे विद्यार्थी १२ वी परिक्षेत विषेश प्रावीन्यासह पास झाले त्यांचा प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास बीड जिल्हा माहेश्वरी समाजाचे उपअध्यक्ष ओमप्रकाशजी भुतडा उपस्थीतह होते
या कार्यक्रमास केज तालुक्यातील रामवडगांव, आडस , कळमअंबा बन्सारोळा व धारुर व केज येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते. या सर्वाचे आभार तालुका अध्यक्ष मनीष जाजू व सचिव सचिन भुतडा यांनी मानले. शेवटी भोजन होवुन कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मंडळ माहेश्वरी समाजाचे सर्व सदस्य व महीला मंडळ यांनी परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला
