केज येथे माळेगाव ते चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी रथयात्रेचे स्वागत
केज – डॉ. हनुमंत सौदागर (विशेष प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षापासून नांदेड येथील माळेगाव येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती रथामध्ये ठेवून पायी दिंडी 31 मे पर्यंत चौंडी ला जात असते या वर्षी या दिंडीचे आगमन रविवार रोजी दुपारी केज येथे झाले
केज शहर नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन स्वागत केले दिंडीसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी संभाजी धुळगुंडे,श्री कुंभारगावे यांनी मार्गदर्शन केले.
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विचाराचा जागर करत ही दिंडी अहिल्यादेवींचे चे जन्मस्थळ चौंडी येथे 31 मे रोजी जयंती दिनी पोहोचणार आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी केज शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दर्शना सह प्रबोधन कार्यक्रम करण्यात आला गुणवंत विद्यार्थि सत्कार करण्यात आला. कार्यक्रम व्यवस्था नियोजन साठी बाळासाहेब गाढवे,अतिश गाढवे,अशोक गाढवे,अशोक रोडे,कृष्णा रोडे
अमोल रोडे,तात्या रोडे,प्रवीण गाढवे,राजाभाऊ डुकरे,अण्णा रोडे,वसंत सौदागर, शिवाजी चेपट आदींनी परिश्रम घेतले.
दर्शन सोहळ्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
