निष्ठावंत शिवसैनिक रत्नाकर (आप्पा) शिंदे यांची शिवसेना बीड जिल्हा प्रमुख म्हणून निवड
केज-
बीड जिल्ह्यातील एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून परिचित असलेले केज येथील रत्नाकर (अप्पा) शिंदे यांची पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. दै. सामना वृत्तपत्र यामध्ये निवडीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
रत्नाकर अप्पा शिंदे यांनी १९९० वर्ष पासून शिवसेनेशी एकनिष्ठ सेवक बनून पक्षाची सेवा केली आहे. जिल्हा प्रमुख म्हणून केज, अंबेजोगाई, परळी, माजलगाव, वडवणी, धारूर हे त्यांचे कार्य क्षेत्र असणार आहे.
रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या निवडीमुळे त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.
