चहावाल्याची बायको झाली पोलीस
एक नव्हे तर दोन ठिकाणी झाली निवड
गौतम बचुटे/केज :- जिद्द, मेहनत आणि चिकाटी असली की परिस्थीवर सुद्धा मात करता येते. हे केज येथे रस्त्यावर चहाची टपरी चालुवून कुटुंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या एका चहावाल्याच्या बायकोची पोलिसांत दोन ठिकाणी निवड झाली आहे.
केज येथील केज-बीड रोडवर पोलीस ठाण्याच्या शेजारी रस्त्यावर चहाची टपरी चालवून बालाजी पाचपिंडे हे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. या शिवाय त्यांना इतर कुठलेली साधन नाही आणि त्यांना स्वतःचे घर देखील नाही. ते केज येथील महात्मा जोतिबा फुले नगर मध्ये भाड्याच्या एका छोट्या खोलीत राहत परंतु त्यांची माधवी पाचपिंडे-वाघचौरे हिने पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शिकवण्या घेऊन कुटुंबाला हातभार लावला. तिने पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. त्यासाठी तिने धावणे व व्यायाम याचा सराव केला आणि लेखी परीक्षेसाठी इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान याचाही अभ्यास केला. यासाठी तिला तिचा नवरा बालाजी पाचपिंडे यांनी प्रोत्साहन दिले. तर माधवीची मोठी नणंद रुक्मिणी पाचपिंडे यांनीही तिला मार्गदर्शन केले.
दरम्यान माधवी हिची मुंबई पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली असून ती लवकरच प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे.
———————————————
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केला माधवीचा सत्कार:- पोलीस ठाण्या आवारात चहाची टपरी चालविणारे बालाजी पाचपिंडे आणि त्याची पत्नी माधवी हिचा केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दोघांचा सत्कार केला. या वेळी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, दिलीप गित्ते, संतोष गित्ते, राजू गुंजाळ, बाळासाहेब अहंकारे, रुक्मिण पाचपिंडे, निरडे, सुर्वे, सतीश बनसोडे हे उपस्थित होते.
——————————————————-
