Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

शाहीर मधुकर कदम वादळवारा पुरस्काराने सन्मानित

By May 15, 2023No Comments2 Mins Read

शाहीर मधुकर कदम वादळवारा पुरस्काराने सन्मानित

गौतम बचुटे/केज :- महाकवी भीमशाहिर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त केज तालुक्यातील विद्रोही भिम शाहीर मधुकर कदम यांना मराठी साहीत्य वार्ता व महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहीत्य सम्मेलन बीड येथे महाकवी वामनदादा कर्डक वादळवारा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) यासारख्या छोट्या गावात राहून शाहिरीला सुरुवात केली. संगीताचे कोणतेही शिक्षण नसताना त्यांनी शाहिरी मध्ये नावलौकिक मिळविला. मधुकर कदम यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कार्यक्रम सादर केलेले आहेत. या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा आणि समाजातील अनिष्ट प्रथेवर प्रहार केला असून फुले, शाहू आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळ यावर ते शाहिरीच्या मद्यमातून प्रबोधनाचे कार्यक्रम करीत असतात.
या त्यांच्या शाहिरीच्या दखल घेऊन बीड येथे झालेल्या मराठी साहीत्य वार्ता व महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहीत्य सम्मेलनात सम्मेलनाध्यक्ष तथा आखील भारतीय वाणीज्य परिषदेचे अध्यक्ष प्रा डॉ वाल्मिक सरवदे, आंबेडकरी साहीत्यीक व अभ्यासक मा. ज. वि. पवार, संयोजक अमरदिप वानखेडे, शेखर मगर यांच्या हस्ते महाकवी वामनदादा कर्डक वादळवारा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
मधुकर कदम त्यांचे लोक चळवळीतील फुले शाहू आंबेडकरी विचारधारा, प्रबोधन, जाणीव जागृती योगदान अतुलनीय आहे. ग्रामीण भागातील प्रबोधनात्मक उत्कृष्ट कार्य या बद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या बद्दल मधुकर कदम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post Views: 18

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.