एस.एम.देशमुख यांचा वाढदिवस केज येथे पत्रकारांनी सामाजिक उपक्रम राबवून केला साजरा
केज-
महाराष्ट्रात ज्यांना पत्रकारांचे आधारस्तंभ म्हणुन ओळखले जाते व मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कानंसाठी सदैव लढा उभारणारे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाना कळ वाटप करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य पत्रकार विजय आरकडे तथा जि. उपाध्यक्ष पत्रकार गौतम बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाना फळ वाटप करण्यात आले प्रसंगी मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडीयाचे तालुका अध्यक्ष रामदास तपसे, आदर्श पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष अशोक सोनवणे , जेष्ट पत्रकार विनोद शिंदे , झुंझार पत्रकार संघाचे ता . अध्यक्ष दत्तात्रय हांडिबाग, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष अजय भांगे, पत्रकार प्रकाश मुंडे, पत्रकार रमेश इतापे, पत्रकार सनी शेख तसेच ग्रां. रुग्णालयाचे कर्मचारी श्रीकृष्ण नागरगोजे, तसेच महिला कर्मचारी यावेळी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
