तीन वर्षीय मुलीसह २२ वर्षीय विवाहिता माहेरातून बेपत्ता
गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातून माहेरी राहत असलेली २२ वर्षीय विवाहिता ही तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाली आहे.
केज तालुक्यातील २२ वर्षीय विवाहिता ही तिच्या नवऱ्या सोबत न्यायालयात कौटुंबिक वाद सुरू असल्याने मागील काही वर्षा पासून ती तिच्या आई-वडीलांकडे माहेरी राहत आहे. तिला एक तीन वर्ष वयाची मुलगी आहे. दि. ९ मे रोजी ती २२ वर्षीय विवाहिता आणि तिची तीन वर्षांची मुलगी ही तिच्या माहेरातून बेपत्ता झालेली आहे. या बाबत बेपत्ता मुलीच्या वडिलांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्राती वरून ती बेपत्ता झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
सदर बेपत्ता विवाहित तरुणी आणि तिची मुलगी यांच्या विषयी कोणाला माहिती असल्यास त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा केज पोलिसांना माहिती द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.