तहसिलदार दुलाजी मेंडके राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या उत्कृष्ट प्रशासकीय
सेवा पुरस्काराने सन्मानीत –
केज
केज तहसिलच्या माध्यमातुन शासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य करुण सामाजीक पटलावर आपली वेगळी छबी उमटविणारे केजचे तहसिदर दुलाजी मेंडके यांना भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केजच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने मंगळवार दि. १० में रोजी प्रमुखांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.
सविस्तर वृत्त असा की भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केजच्या वतीने प्रशासकीय, सामाजीक , पत्रकारीता, शैक्षणिक, वैद्यकीय, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. उत्कृष्ट प्रशासकीय सेवा या पुरस्कारासाठी केजचे तहसिलदार दुलाजी मेंडके यांची निवड केली होती त्यांची बदली औरंगाबाद या ठिकाणी झाली असल्यामुळे आज रोजी त्यांना हा पुरस्कार तहसिल कार्यालय केज येथे प्रदान करण्यात आला प्रसंगी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष अजय भांगे ,उपाध्यक्ष साजेद इनामदार ,ता. सरचिटणीस मुबाशीर खतीब , पत्रकार गौतम बचुटे , पत्रकार महादेव काळे क्रिडा पत्रकार विनोद गुंड , पत्रकार सनी शेख, तथा केज तहसिल कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
