कोरोना योद्धा म्हणून उत्कृष्ट काम केलेले केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांची औरंगाबाद येथे बदली
गौतम बचुटे/केज :-
कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून सर्व तालुक्यात उत्कृष्ट कार्य केलेले सर्व परिचित केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांची औरंगाबाद येथे बदली झाली आहे.
तहसीलदार दुलाजी मेंडके हे दि १४ मार्च २०१९ हे केज येथे तहसीलदार पदावर रुजू झाले होते त्यांनी २०२० ते २०२२ या कोरोनाच्या महामारी आणि लॉक डाऊन मध्ये स्वतः रस्त्यावर उतरुन लोकांना शिस्त लावणे व अन्नधान्य आणि किराणा वाटप तसेच जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरले होते. तर परप्रांतीय मजूर यांना यांना त्यांच्या घरी पोहोचवीन्य साठी शासन स्तरावरून मदत करण्यास प्रयत्न केले. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका होती.
दरम्यान चार वर्ष त्यांनी केज येथे सेवा केल्या नंतर दि. ८ मे रोजी बदलीचे आदेश निर्गमित झाले आहेत. त्यांची बदली औरंगाबाद येथे अन्न धान्य वितरण अधिकारी या पदावर झाली आहे. दि. ११ मे रोजी त्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे कळविले आहे.
केज तालुक्यतील नागरिक आणि सर्व कर्मचारी यांनी त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
