रमेशरावजी आडसकर यांची भाजप प्रदेशाध्यक्ष कार्यकारणीवर निवड
बीड जिल्ह्यातून होत आहे अभिनंदन
बीड-
बीड जिल्हा भाजपाचे नेते, रमेशरावजी आडसकर यांची भाजपा प्रदेश सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीने माजलगाव-केज मतदारसंघातून भाजप कार्यकर्ते, नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. रमेशरावजी आडसकर यांनी बीड जिल्ह्यात आपल्या राजकीय कार्याचा ठसा उमटवला आहे. पक्षाचे विचार, संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न स्थानिक संस्थेवरील त्यांची पकड त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार रमेशरावजी आडसकर यांची भाजपा प्रदेश कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
