केज नगरपंचायतकडून उमरी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन संपन्न
हारून इनामदार यांचे प्रयत्न सफल तर प्रा. हनुमंत भोसले सर यांचा अनेक वर्षापासूनचा लढा यशस्वी
उमरी रस्ताचे काम माझ्या कार्यकाळात होत आहे याचा मला मनस्वी आनंद-
सिताताई बनसोड- नगराधक्षा
केज–
शहरातील म्हत्वाचा व सतत चर्चेत असलेल्या उमरी रस्त्याचे जवळपास दोन दशकांचा वनवास संपणार असून, नगरपंचायतीने मंगळवारी ( दि. २ ) या रस्त्याचे भूमिपूजन केले. जनविकास आघाडीचे प्रमुख हारुन इनामदार यांनी या परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनचा भावनेचा प्रश्न म्हणजे उमरी रस्ता झाला पाहिजे यासाठी दिलेल्या शब्द पाळून अखेर या रस्त्याचे उद्घाटन न. प. च्या वतीने करण्यात आले. त्यामुळे या भागातील चांगल्या रस्त्याचे स्वप्न साकार होणार अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
यावेळी मा. हारून इनामदार यांनी बोलताना सांगितले की, लवकरच या कामाला सुरुवात संपूर्ण रस्ता हा दर्जेदार बनवून या भागातील अनेक वर्षापासून रखडत पडलेला वाहतूकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
———————————-
सामाजिक कार्यकर्ते प्रा. भोसले सरांच्या लढ्याला यश–
उमरी रस्त्याच्या प्रमुख मागणीसाठी या भागातील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर यांनी अनेक आंदोलन करून शासकीय, राजकीय पातळीवर हा प्रश्न उपस्थित करून लढा कायम ठेवला आहे. अखेर या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन झाले आहे. लवकरच काम सुरू केले जाईल असे न. प. प्रशासन व सत्ताधारी, उपस्थित नगरसेवक यांनी सांगितले आहे. त्यामुळे भोसले सरांच्या लढ्याला यश आले असल्याचे परिसरातील नागरिक म्हणून दाखवत आहेत.
——————————-
उमरी रस्ताचे काम माझ्या कार्यकाळात होत आहे त्याचा मला मनस्वी आनंद
नगराध्यक्षा– सिताताई बनसोड
नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न व गेल्या अनेक वर्षापासून रखडत पडलेला उमरी रस्ताचे कामाचे उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखाली झाले व हे काम माझ्या कार्यकाळात लवकरच पुर्ण होणार याचा मला मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी व्यक्त केल्या आहेत.
——————————–
उमरी रस्त्याचे भूमीपूजन जनविकास आघाडीचे प्रमुख हारुन इनामदार यांच्या हस्ते तर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी नगरसेवक मुस्तफा खुरेशी, नगरसेवक गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक गटनेते भाऊसाहेब गुंड, बाळासाहेब गाढवे, ओम रांजनकर, खेसर इनामदार, नगरसेवक पद्मिनबाई शिंदे, नगरसेवक सुग्रीव कराड, नगरसेवक जलाल इनामदार, शेख सादेक, हाजी बॉस, पत्रकार डी.डी.बनसोडे,
दत्तात्रय हंडीबाग, दशरथ चवरे, मधुकर शिरसट, तात्या रोडे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. जवळपास मागील दोन दशकांपासूनचे रस्त्याचे स्वप्न साकार होणार असल्याने या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
