केज सह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
मोठे नुकसान झाल्याचा अंदाज
केज-
आज दि. २८ रोजी दुपारी ४ च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने केज सह अनेक गावांना झोडपून काढले. या अचानक झालेल्या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत,अनेक घरांचे नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस ऐवढा भयंकर होता, की,मुख्यरस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळीच केळगाव येथे एका शेतकरी याचा विज पडून मृत्यू झाला होता.
