केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे पारडे जड
केज-
केज तालुक्याचा विचार केल्यास बहुतांश ग्रामपंचायती व सोसायटी संस्था ह्या रमेशराव आडसकर यांच्या ताब्यात आहेत. पुर्विपासूनच आडसकर यांचे वर्चस्व कृ.उ.बा.समिती केज वर रहीलेले आहे. मात्र यावेळी निवडणूक लागल्याने दि. २८ ला मतदान होणार आहे. या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचेही बळ मिळाले आहे.
शेतकरी विकास पॅनल यांचे सर्वसमावेशक उमेदवार असल्यामुळे तसेच तीन जागा बिनविरोध काढल्यामुळे आणी या पॅनलचे नेतृत्व लोकनेत्या पंकजाताई मुंडे , खासदार प्रितमताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा , नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर , अंकुशराव इंगळे या दिग्गजांचे आसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक एकतर्फी होणार असल्याचे चर्चा केज तालुक्यात सर्वत्र होत आहे.
