डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास जीवन यशस्वी होईल..!
डॉ. अरूणा केंद्रे (दहिफळे)
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जीवनात आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करून त्यांच्या विचारांचे अनुकरण केले तर नक्कीच आपले जीवन यशस्वी होईल असे मत लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुणा केंद्रे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण चौक येथील टिळक नगर भागातील,दि. १४ एप्रिल रोजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात
त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेजोगाई येथील उपजिल्हाधिकारी विश्वास शिरसाठ तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी कांबळे, माजी प्राचार्य काळदाते सर, ज्येष्ठ नागरिक हिरामण गवळी, आदी उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनाने करण्यात आली.
उपस्थित इतर मान्यवरांनी
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या भाषणातून अभिवादन केले.
कार्यक्रमात बोलताना गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले की, आपण विज्ञानवादी बनले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचा आदर्श वाटेल. आज संपूर्ण जग आज विज्ञानावर आधारित आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून सर्वांनी संविधानाचे पालन करावे असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात उपजिल्हाधिकारी विश्वास शिरसाट यांनी वाचणाचे महत्त्व सांगताना म्हटले की, बाबासाहेबांची जयंती वाचण आणि विविध उपक्रम राबवून साजरी केल्याने भावी पिढीला आदर्श निर्माण होईल वाचनामध्ये खूप ताकद असते आपणही विविध पुस्तकांचे वाचन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
लोखंडी सावरगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला जयंती निमित्त भेट देऊन डॉ. अरूणा केंद्रे यांनी अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन वर्षाताई गालफाडे मॅडम यांनी केले. शेवटी आभार उत्तम डोंगरे सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपा नंतर खीर वाटप करण्यात आली.
