
केज बस स्थानक येथे पाणपोई :- मोफत पिण्याचे पाणी उद्घाटन संपन्न
केज–
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अक्षर सेवाभावी संस्था, मराठवाडा साहित्य परिषद, शिक्षक मित्र परिवार केज यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानक केज येथे पाणपोई मोफत पिण्याचे पाणी यांचे सर्वसामान्यांसाठी उद्घाटन समारंभ श्री शिवाजी नाईकवाडे साहेब सहाय्यक आयुक्त औरंगाबाद, श्री पवार साहेब पोलीस निरीक्षक केज, श्री कोमटवार साहेब आगार प्रमुख धारूर, श्री सुनील केंद्रे साहेब गटशिक्षणाधिकारी केज, कादरी साहेब पोलीस उपनिरीक्षक केज, श्री बेडसकर साहेब वरिष्ठ विस्तार अधिकारी केज, श्री जगदीश शिकची साहेब बस स्थानक प्रमुख केज, अक्षर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री विष्णू यादव सर, सचिव श्री विक्रम डोईफोडे सर, उपाध्यक्ष श्री युवराज हिरवे सर, कोषाध्यक्ष श्री महादेव ढाकणे सर, सहसचिव श्री राहुल काकनाळे सर , सदस्य तथा कोषाध्यक्ष शिक्षक सहकारी पतसंस्था केज श्री किशोर भालेराव सर, लहूरी केंद्राचे केंद्रप्रमुख कांबळे साहेब , डॉक्टर ठोके साहेब, ज्येष्ठ पदवीधर शिक्षक अश्रुबा सोनवणे सर, मुख्याध्यापिका द्रौपदी सूर्यवंशी मॅडम व मराडवाडा शिक्षक संघाचे तालुका सहसचिव जयपाल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल काकनाळे सर यांनी केले, प्रास्ताविक श्री विक्रम डोईफोडे सर यांनी केले 20 रुपयाची पाणी बॉटल घेऊन स्वच्छ पाणी पिण्यापेक्षा पैसे तिकिटाला वापरलेले बरे असा विचार करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही पानपोई आहे याची सर्व आर्थिक जबाबदारी आम्ही समूहाने घेतली आहे ज्या समाजामध्ये इतिहासात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला अशा महान व्यक्तीच्या जन्मदिनी सर्वांच्या सहकार्याने मोफत पिण्याचे पाणी सर्व सामान्यांसाठी दरवर्षीप्रमाणे उपलब्ध करून देता आले. “देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता देणाऱ्यांचे हात घ्यावे “. तसेच उपस्थित मान्यवरांनी आजच्या पाणपोई उद्घाटना संबंधी थोडक्यात मत व्यक्त केले यापुढेही सर्व उपक्रमास सर्वांचे तन-मन धनाने सहकार्य राहील असे आश्वासन मिळाले . याप्रसंगी पाटील सर, सांगळे सर, कदम सर, बनसोडे सर, हनुमंत कांबळे सर, नेमाने सर, उरगुंडे सर, गिरी सर, इतर शिक्षक वृंद आणि असंख्य प्रवासी, नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे, आर्थिक निधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार श्री महादेव ढाकणे सर यांनी मानले.
