केज तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यायला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने एकरी एक लाख रु मदत घ्यावी
— विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
गौतम बचुटे/केज :- गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच व्यथा ऐकून मन व्यथित होते. शेतकऱ्यांना यातून उभारी देण्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रु अनुदान देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांच्या नुकसानीची पाहणी करून माध्यमांशी बोलताना केली.
दि. ८ एप्रिल रोजी केज तालुक्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दि. १३ एप्रिल रोजी केज तालुक्यातील बोरगाव बु येथे आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांच्या शेतातील गारपिटीने नुकसान झालेल्या मिरची, ढोबळी मिरची, काकडी आणि टरबूज या पूर्णतः उध्वस्त झालेले आहे त्याची अंबादास दानवे यांनी पहाणी केली त्यावेळी अंबादास दानवे यांनी सरकारने गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रु अनुदान देण्याची मागणी केली तसेच शेतातील मल्चिंग आणि इतरही खूप मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले तर यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची फी, व शिक्षनावरही परिणाम होणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रशासन त्यांचे काम करीत आहे पण सरकार मदत करीत नाही. असा टोला त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव न घेता लगावला. या दौऱ्यात त्यांच्या सोबत माजी आमदार सुनील धांडे, जिल्हा प्रमुखअनिल जगताप व आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब अंबुरे, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे हे उपस्थित होते. तसेच यावेळी तहसीलदार डी सी मेंडके, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, तालुका कृषी अधिकारी वाघमारे, नायब तहसीलदार सुहास हजारे हे उपस्थित होते.
————————————————-
बहिणीच्या नुकसान पाहून वृद्ध भावाला अश्रू अनावर झाले. :- दत्तात्रय शिंदे यांच्या शेतातील झालेले नुकसान पाहून त्यांच्या पत्नीच्या वृद्ध भावाला अश्रू अनावर झाले. त्यांनी हंबरडा फोडून माझ्या बहिण आणि मेव्हण्याचा गारपिटीने मोडलेला संसार कसा उभा करावा? असा प्रश्न केला.
—————————————————-
