Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज तालुक्यात दुसऱ्या दिवशीही शेतात गारांचा खच आंबा चिंच यासह भाजीपाला व फळ भाज्या आणि ज्वारी गव्हाचे प्रचंड नुकसान आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांची तातडीने पंचनामे करण्याचा सुचना

By April 9, 2023No Comments2 Mins Read

केज तालुक्यात दुसऱ्या दिवशीही शेतात गारांचा खच

आंबा चिंच यासह भाजीपाला व फळ भाज्या आणि ज्वारी गव्हाचे प्रचंड नुकसान

आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांची तातडीने पंचनामे करण्याचा सुचना

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील काल झालेल्या गारपिटीचा खच दुसर्या दिवशीही सकाळ पर्यंत ही कायम असून केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून अठरा तासा नंतरही या गारा विरघळलेल्या नसून हिमनद्या असल्या सारखे दिसत आहे.

केज तालुक्यावर काल दि. ८ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी गारपिटीने केज तालुक्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. केज तालुक्यातील हादगाव, डोका, वरपगाव, बोरगाव ( बु),भोपला, शिरूर, नांदूरघाट, उत्तरेश्वर पिंप्री, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, चिंचोली माळी, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळवारा आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. या गारपिटीने आंबा, चिंच, फळभाज्या, पालेभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे.

९ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वा. नंतरही झालेल्या गारपीट अठरा तासा नंतरही शेतात गारांचा खच पडलेला असून नाल्यामध्ये अजूनही गारा असल्याने हिमनद्या असल्याचा भास होत आहे.
————————————————

काश्मीर सारख्या हिमनद्यांचा भास :-
डोका,बोरगाव, भोपला, आणि परिसरात अठरा तासा नंतरही गारांचा खच पडलेला असून साठलेल्या गारांचा खच हा काश्मीर सारख्या हिमनद्या सारखा दिसत आहे.
———————————————

आ नमिता मुंदडा यांनी केली नुकसान भरपाई देण्याची मागणी :- केज तालुक्यात झालेल्या गारपिटीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आ नमिताताई मुंदडा यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच महसूल अधिकार्यांना तातडीने नुकसानीची पाहणी करून पंचणामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
———————————————–

तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषि अधिकारी करणार पहाणी :- या गरपीठीची तहसीलदार डी. सी. मेंडके, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे आणि तालुका कृषी अधिकारी वाघमारे हे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पहाणी करणार आहेत.
————————————————
तीन ठिकाणी विजा कोसळून पाच जनावरे दगावली :- गारपिटीत मांगवडगाव, देवगाव आणि हंगेवाडी येथे विजा कोसळून पाच जनावरे दगावली आहेत.

Post Views: 18

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.