Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

अवैद्य वाळू उपशावर पंकज कुमावत यांची पुन्हा कारवाई

By April 4, 2023No Comments2 Mins Read

अवैद्य वाळू उपशावर पंकज कुमावत यांची पुन्हा कारवाई

 

गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिग्रस येथील गोदावरी नदी पात्रात कारवाई करून अवैद्य वाळू उपसा व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैद्य वाळू उपसा करणारे धास्तावले आहेत.
या बाबतची माहिती अशी केज दि. ३ एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिग्रस ता. परळी येथील गोदा पात्रातुन सुभाष नाटकर हे केणीच्या साहाय्याने बेकायदेशीर व अवैद्यरित्या वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये भरून अवैद्य वाहतूक करीत आहे.
माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच त्यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे, बालाजी दराडे, सचिन अहंकारे, विकास चोपने, रामहरी भंडाने आणि अनिल मंदे यांनी दि. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री १:३० वा. च्या सुमारास सदर ठिकाणी गोदावरी नदी पात्रात कारवाई केली. त्यावेळी पोलीस पथकाने वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर, वाळू उपसण्यासाठी उपयोगात येणारी केनी व लोकेशनसाठी लागणारी मोटार सायकल व ट्रॅक्टर चालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Post Views: 32

Related Posts

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026

काळेगाव घाट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ भागवत कथा सोहळ्याचे आयोजन. ” भक्तीचा जागर ;विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल.

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.