आज केज येथे शांतता समितीची बैठक
गौतम बचुटे/केज :-
श्रीरामनवमी व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे.
श्रीराम नवमी आणि रमजान ईद या हिंदू-मुस्लिम बांधवांच्या सणांच्या पार्श्वभूमीवर केज पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी आज दि. २७ मार्च रोजी दुपारी ३:३० शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, श्रीराम नवमी जयंतीचे अध्यक्ष, मुस्लिम धर्मगुरू, मौलाना व पत्रकार बांधव यांनी बैठकीसाठी वेळेवर हजर रहावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.
