मानव विकास संरक्षण समितीच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख सनी यांची निवड….
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात सर्व परिचीत असे युवा पत्रकार शेख महेबूब (सनी) यांची मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकारच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी कुराडे साहेब यांच्या आदेशावरून HR डिपार्टमेंटचे प्रवीण गायकवाड व बीड जिल्हा अध्यक्ष मुस्तफा पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेख महेबूब (सनी) यांची मानव विकास संरक्षण समितीच्या परळी व केज या दोन विधानसभा मतदारसंघासाठी निवड करण्यात आली आहे.
निवडी नंतर शेख सनी यांनी मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी कुराडे साहेब व जिल्हा अध्यक्ष मुस्तफा पठाण यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात काम करेन व मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकारचे
संपूर्ण नियम अटीचे काटेकोर पणे पालन करीन व जनमानसाच्या हिताचे,जनमानसाची फसवणुक करणाऱ्या, भ्रष्टाचार करणारे,महिला अत्याचार विरोधी जनआंदोलन करून जनमाणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सदयव प्रयत्नशील असेल व समाज जागृत करून या पदावर जबाबदारीने काम करीन या पदाचा कुठलाही गैर वापर करणार नाही सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत महेबूब (सनी) शेख यांनी व्यक्त केले आहे.
या निवडीनंतर जिल्ह्यातुन मित्र परिवारा कडून अभिनंदन केले जात आहे.
