“माहेश्वरी”च्या तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते उमेश जेथलिया
लड्डा, काबरा, बजाज, मानधने,गिलडा, लोहिया यांची ही वर्णी
माजलगाव:
अखिल भारत वर्षीय माहेश्वरी महासभा संलग्न माजलगाव तालुका माहेश्वरी सभेच्या 2022-25 च्या कार्यकाळासाठी तालुकाध्यक्ष पदी महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेशकुमार जेथलिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजलगाव माहेश्वरी सभेच्या इतिहासात सर्वात तरुण तालुकाध्यक्ष म्हणून जेथलिया यांची नोंद होईल.तालुकासचिव पदी रामकिशोर लड्डा यांची निवड करण्यात आली.
गुरुवारी रात्री 9 वाजता शहरातील बालाजी मंदिर येथे तालुकाध्यक्ष विनोदकुमार जाजू यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारिणीच्या 32 सदस्या सह समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.या बैठकीत 2019-22 च्या कार्यकाळात व कोव्हिडं काळात उल्लेखनीय काम केलेल्या तालुका सचिव उमेशकुमार जेथलिया यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड झाली.तर उपाध्यक्ष पदी प्रा प्रवीण गिलडा,विवेक बजाज सचिव पदी रामकिशोर लड्डा,सह सचिव पदी गोपाल मानधने, तर कोषाध्यक्ष पदी नवलकिशोर काबरा संघटन मंत्री गणेश लोहिया यांची निवड करण्यात आली .
या बैठकीस उपाध्यक्ष बालप्रसाद भुतडा,रमेशचंद कासट,राधेश्याम लोहिया,राधेश्याम जेथलिया, राजेंद्र नावदंर,गोविंद बजाज,राजेंद्र इंदानी,डॉ श्यामसुंदर काकानी,ओमप्रकाश मुंदडा,दिलीप रांधड,राजेंद्र करवा,संतोष जेथलिया,डॉ कमलकिशोर लड्डा,लक्ष्मीकांत मानधने,डॉ संजय जेथलिया, सुनील मालाणी,पुरुषोत्तम मुंदडा,श्री किशन कालिया,विवेक मुंदडा,रमेश चांडक,रामानंद झंवर,विपीन नावदंर,सागर मानधने,विकास मालाणी,विनोद बजाज,डॉ नितीन जेथलिया, रवी मानधने,शिवणारायन सोनी,प्रशांत गिलडा,नितीन मालाणी,आकाश बियाणी,कृष्णा कासट,सागर करवा,बाळाप्रसाद करवा,रमेश बाहेती,पुरुषोत्तम लड्डा हे उपस्थित होते.कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
————————————–

2003 ते 6 युवा जिल्हा सह सचिव, 2009 ते 2016 शहर सह सचिव म्हणून काम पाहिले 2016 ते 19 तालुका सह सचिव,2019 ते 2022 तालुका सचिव म्हणून उमेश जेथलिया यांनी काम केले.या कामाची पावती म्हणून त्यांची या वर्षी तालुकाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.महाराष्ट्र पत्रकार संघाचे ते तालुकाध्यक्ष आहेत.जय महेश ग्रुप चा माजलगाव भूषण,केज पत्रकार संघाचा निर्भीड पत्रकार हे पुरस्कार उमेश जेथलिया यांना मिळाला आहे