केज तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट;
अवकाळी पावसाने शेती पिकाचे अतोनात नुकसान
/केज :- केज तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असल्याने गहू, हरबरा, आंबा यासह फळभाज्या, भाजीपाला आणि टरबूज यांचे नुकसान झाले आहे.
दि. १८ मार्च रोजी दुपारी केज तालुक्यातील केज, मस्साजोग, काळेगाव, नांदूरघाट, पिंप्री, हदगाव, डोका, सातेफळ, माळेगाव, कोरेगाव, कोठी, सांगवी, सारणी, गोटेगाव, मोटेगाव, होळ, चंदनसावरगाव, चिंचोली माळी, युसुफवडगाव, विडा, आडस, येवता, लव्हुरी, कानडी, येथे पाऊस व गारपीट झाली. गारासह पडलेल्या अवकाळी पावसाने गहू, हरबरा, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे तसेच आंबा आणि फळभाज्या, भाजीपाला व टरबूज आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
