गाडीचे नुकसान करून ह.भ.प. महाराजांना दिली जीवे मारण्याची धमकी
गौतम बचुटे/केज :- संस्थानचे मठाधिपती असलेले रामयणाचार्य ह भ प गणेशानंद महाराज जोगदंड यांच्या उभ्या गाडीवर एका माथेफिरुने दगडफेक करून महाराजांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या बाबतची माहीती अशी की, दि. ७ मार्च रोजी बीड जिल्ह्यातील साळेगांव ता. केज येथील शांतीब्रह्म संस्थानचे मठाधिपती रामायणाचार्य ह.भ.प. गणेशानंद महाराज जोगदंड शास्त्री यांनी एकनाथ महाराज यांच्या षष्ठी निमित्त १० मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. तसेच येथे एकनाथ महाराज यांच्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मंदिर बांधकाम सुरू असलेल्या परिसरात त्या निमित्त गणेशानंद महाराज हे माजी सरपंच नारायण लांडगे, हनुमंत ठोंबरे आणि संजय गित्ते यांच्या सोबत सप्ताहा निमित्त कार्यक्रम याची चर्चा करून नियोजन करीत होते. बाजूलाच त्यांची होंडा मोबिलो गाडी क्र. ( एम एच-२५/आर आर-६८८०) उभी होती.
त्या वेळी दुपारी १२.०० वा. एका माथेफिरूने गणेशानंद महाराज जोगदंड शास्त्री यांना शिवीगाळ करून महाराजांच्या उभ्या चार चाकी गाडी होंडा क्र. (एम एच-२५/आर आर-६८८०) या गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. या प्रकरणी ह.भ.प. गणेशानंद महाराज शास्त्री यांच्या तक्रारी नुसार संतोष गित्ते याच्यावर भा. दं. वि. ४२७, ५०४ आणि ५०६ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे तपास करीत आहेत.
————————————————
बॅनरवरच्या फोटोमुळे झाला वाद !
” मी स्वतःची दोन एकर जमीन विकून साळेगाव येथे सातेफळ रोडला मी समाजकार्यासाठी अठरापगड जातीतील तरुण व्यसन मुक्त व्हावा, या देशातील संपन्न शांतीची हेतूने, अनाथाला शांती ब्रम्ह संत एकनाथ महाराजांचे मंदीर या भूमीत बांधत आहे. चारित्र त्याला शुद्ध तरुण सदाचारयुक्त सुसंस्कारीत घडावा व परमार्थाची अनुभूती यावी. या करिता आम्ही १० मार्च ते १७ मार्च दरम्यान नाथषष्ठी पुर्ती निमित सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचे ग्रामस्थाच्या बनीने बॅनर लावण्यात आले होते. त्यात बॅनरमध्ये लक्ष्मण ओव्हाळ यांचा फोटो असून लक्ष्मण ओव्हाळचा फोटो का टाकला? म्हणून संतोष धोंडीराम गीते यांनी मंदीरावर येवून शिवीगाळ केली. दाऊ पिऊन मंदीरावर आले आणि शिवीगाळ केली आणि माझी होंडा मोबीलो गाडीच्या चारही बाजूच्या सर्व काचा फोडून गाडीचे नुकसान केले.”
— ह. भ. प. गणेशानंद जोगदंड महाराज शास्त्री
मठाधिपती, नित्यानंद शांतीब्रम्ह आश्रम, साळेगांव
