शोभेची दारू निर्मिती कारखान्यात मोठा स्फोट
पोलीस घटनास्थळी दाखल
केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर)येथील
घटना
गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथील शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात आज दि. २७ रोजी, दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे मात्र सुदैवाने कुणीही जखमी किंवा जीवित हानी नाही. घटनास्थळी स पो नी योगेश उबाळे यांनी भेट दिली आहे. हा स्फोट कोणत्या कारणांमुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही मात्र युसुफ वडगाव पोलीस अधिकारी, कर्मचारी तपास करत आहेत.
