Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज तालुक्यात एका महिन्यात दुसरा बालविवाह ! आई-वडील, सासू-सासरे आणि नवऱ्यासह सात जणां विरुद्ध गुन्हा दाखल !

By February 24, 2023Updated:February 24, 2023No Comments2 Mins Read

केज तालुक्यात एका महिन्यात दुसरा बालविवाह !

आई-वडील, सासू-सासरे आणि नवऱ्यासह सात जणां विरुद्ध गुन्हा दाखल !

गौतम बचुटे/केज :- दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छे विरुद्ध लग्न लावून दिले. तिने हे लग्न मान्य नाही व नांदणार नाही. असे म्हणताच वडील, आजोबा आणि मामाने तिला एका गाडीत बसवून अज्ञात स्थळी सोडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीचे आई वडील, आजोबा, मामा, सासू सासरे आणि नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या इच्छे विरुद्ध दि. १६ फेब्रुवारी रोजी तिच्या मामाच्या गावी मांगवडगाव ता. केज येथील शेतात औरंगाबाद येथील एका तरुणा सोबत लावून दिला. सदर अल्पवयीन मुलगी ही त्या विवाहास तयार नसताना बळजबरीने व धमकी देऊन तिचा विवाह लावून देण्यात आला. त्या नंतर सासू-सासरे आणि नवऱ्या सोबत एका गाडीने घेऊन ते औरंगाबादला घेऊन गेले. औरंगाबादला गेल्यास त्या रात्री अल्पवयीन मुलीने तिला हे लग्न मान्य नसल्याने इथे राहणार नाही; असे सांगीतले. तेव्हा तिला सासरच्या मंडळींनी धमकावले तसेच तिच्या आई-वडिलांना फोन केला आणि हा प्रकार सांगितला.

त्या नंतर दि. १८ फेब्रुवारी रोजी मुलीचे वडील, आजोबा आणि मामा हे स्कॉर्पिओ गाडीने औरंगाबादला गेले. तिथे तिला सर्वांनी मारहाण केली. तिला त्यांच्या सोबत स्कॉर्पिओ गाडीत बसवून एका अज्ञात स्थळी नेऊन सोडून दिले आणि ते सर्व निघून गेले. त्या अल्पवयीन मुलीने एका महिलेला तिची व्यथा सांगितल्या नंतर ती महिला व एक पुरुष यांच्या मदतीने तिने दौलताबाद पोलीस ठाण्यात जाऊन दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वा. आई-वडील, आजोबा, मामा, सासू-सासरे, व नवरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा हा युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत मांगवडगाव येथील असल्याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ३६/२०२३ भा. दं. वि. ३२३, ५०४, ३४ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १० आणि ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे हे पुढील तपास करित आहेत

————————————————

*एक महिन्यातील दुसरी घटना ! :-* या पूर्वी दि. २८ जानेवारी रोजी असाच एक अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. म्हणून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आई-वडील, मामा-मामी, सासू-सासरे, दीर-जाऊ, नवरा आणि मेव्हणा या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.

 

Post Views: 17

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.