केज तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
केज-
जय बजरंग युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त केज तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन दि.19 ला करण्यात आले होते.
या स्पर्धेत केज सह तालुक्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
दि.२२ रोजी या सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितर इंटेल कॉम्प्युटर सेंटर, केज येथे करण्यात आले.
या सामान्यज्ञान स्पर्धेत
चि.शेलार सोमेश्वर हनुमंत प्रथमक्रमांक, (सानेगुरुजी निवासी विद्यालय, केज)
मंगरुळकर कल्याणी दुसरा क्रमांक,
( स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, केज)
चि.चौरे अशोक तृतीय क्रमांक, (साने गुरुजी निवासी विद्यालय ,केज) यांनी पारितोषिक पटकावले.
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहीत कसबे, इंटेल काँप्युटरचे संचालक गणेश सत्वधर, सांगळे सर व प्रथम व तृतीय विजेते स्पर्धक यांच्या मार्गदर्शक सह शिक्षिका सुवर्णा सिरसट
( सानेगुरुजी निवासी विद्यालय, केज) यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. विजयी स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
