Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज विधानसभा मतदारसंघात नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते तीन कोटींच्या विकास कामाचे आज

By February 20, 2023No Comments2 Mins Read

विधानसभा मतदारसंघात नमिताताई मुंदडा यांच्याकेज हस्ते तीन कोटींच्या विकास कामाचे आज उद्घघाटन

केज-
केज विधानसभा मतदारसंघातील केज व अंबेजोगाई तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अंतर्गत लिंक लाईन व ब्रेकर बसवने या तीन कोटी विकास कामाचे भुमिपुजन केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिता ताई मुंदडा, अक्षय भैया मुंदडा व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते आज होणार आहे. तरी त्या त्या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. केज मतदारसंघातील विद्युत पुरवठ्यातील विविध अडथळे दूर करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात येणाऱ्या पठाण मांडवा येथील ३३केव्ही उपकेंद्रातील नागझरी फीडर येथे ११केव्ही उच्चदाब वाहिनी व ११केव्ही ब्रेकर बसवने हा कार्यक्रम मांडवा पठाण येथील उपकेंद्रावर सकाळी ८:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदरील कामावर ३४लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. या सोबतच चन्ई ते डोंगरपिंपळा ३३केव्ही उच्चदाब वाहिनी व ब्रेकर बसवने मौजे धावडी येथे उच्चदाब वाहिनी व सोनवळा येथे ब्रेकर बसवने. चिंचखंडी ते डोंगरपिंपळा ११केव्ही उच्चदाब वाहिनी या कामाची सुरुवात डोंगरपिंपळा येथे सकाळी ९:३० वाजता करण्यात येणार आहे. या कामाची अंदाजे रक्कम १कोटी २२लक्ष रुपये आहे. डिघोळ अंबा येथील ११केव्हु उच्चदाब वाहिनीच्या कामाचा प्रारंभ सकाळी ११:३० वाजता डिघोळ अंबा येथे करण्यात येणार आहे. या कामावर ४० लक्ष खर्च अपेक्षित आहे. होळ ते दिपेवडगाव ११केव्ही उच्चदाब वाहिनी कामाचा शुभारंभ दिपेवडगाव येथे करण्यात येणार आहे. या कामावर ४०लक्ष रुपये खर्च होणार आहे. होळ येथे ३३केव्ही उपकेंद्रावर ब्रेकर बसवने या कामाचा शुभारंभ दुपारी ४:३० वाजता होळ येथील उपकेंद्रावर होणार आहे. या कामावर ९लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. युसुफ वडगाव माळेगाव ३३केव्ही उच्चदाब वाहिनी कामाचा प्रारंभ युसुफ वडगाव येथे सायंकाळी ५:३० वाजता करण्यात येणार आहे. या कामावर ८४लक्ष रुपये खर्च होणार आहे. केज मतदारसंघातील विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी या कामाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. या भुमिपुजन कार्यक्रमासाठी त्या त्या भागातील नागरिक व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन विद्युत मंडळ व संयोजकांनी केले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आ. नमिता ताई मुंदडा व भाजपचे जेष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांचे शेतकरी वर्गातून कौतुक केले जात आहे.

Post Views: 24

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.