Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

छत्रपती शेतकरी गट आनंदगावचा अभिनव उपक्रम ( घरपट्टी नळपट्टी कर भरा अन अल्पदरात शेतीची मशागत करा)

By February 19, 2023No Comments2 Mins Read

छत्रपती शेतकरी गट आनंदगावचा अभिनव उपक्रम

( घरपट्टी नळपट्टी कर भरा अन अल्पदरात शेतीची मशागत करा)

केज-

तालुक्यातील आनंदगाव हे नेहमीच विविध चळवळीसाठी अग्रेसर राहिलेले आहे पाणी फाउंडेशन यांसह विविध उपक्रम नेहमी घेतले जातात

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शेतकरी गटाने रविवार रोजी ट्रॅक्टर खरेदी केला. हा ट्रॅक्टर आनंदगाव शिवारातील शेतकऱ्यांना मशागतीची कामे करण्यासाठी उपलब्ध असणार आहे . जे शेतकरी घरपट्टी नळपट्टी भरणा करतील त्यांना इतर दरापेक्षा एकरी शंभर रुपये कमी दराने मशागतीसाठी ट्रॅक्टर देण्यात येणार आहे अशी घोषणा गटाने केली. गटशेतीतून गावाला समृद्ध करण्यासाठी हा छोटासा प्रयोग गट करत आहे. शेतकरी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन त्यांनी केले
यामुळे आता ग्राम विकासाला हातभार लागेल
केज तहसीलचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे , केज तालुका कृषी अधिकारी पी एस वाघमारे ,कृषी सहाय्यक एस एस माचवे , डी एम जाधव,पानी फाउंडेशन चे प्रवीण काथवटे आदींच्या हस्ते केज येथे ट्रॅक्टरची पूजा करून श्रीफळ फोडून गटाला शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना सचिन देशपांडे म्हणाले छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनी हा स्तुत्य उपक्रम असून यामधून ग्राम समृद्ध होईल. ही एक प्रकारची समाजसेवा आहे शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळेल असे मत व्यक्त केले.
गटाने असे प्रयोग राबवल्यास कृषी विभाग कायम सहकार्य करेल असे मत कृषी अधिकारी वाघमारे यांनी व्यक्त केले .
गटाचे अध्यक्ष अरुण गायकवाड,सचिव गणेश राऊत,रजनीकांत भोगजकर,धर्मराज शिंदे,विठ्ठल कदम, हनुमंत सौदागर,राहुल कदम
,हरिदास गायकवाड,भगवान कल्याण कदम,भीमराव पौळ ,चक्रधर गायकवाड,ईश्वर करपे यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

———-चौकट——-
गावातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतचा आपला कर भरणा केल्यास त्यांना छत्रपती शेतकरी गटाकडून ट्रॅक्टर अल्प दराने उपलब्ध होणार आहे ही बाब ग्रामपंचायत साठी पूरक आहे. गटाच्या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा आहेत नागरिकांनी ग्रामपंचायतीचा कर भरून घ्यावा सहकार्य करावे.

सरपंच सौ अंजना गायकवाड आनंदगाव

—————-

चौकट

ग्रामसमृद्धीसाठी ही वेगळी संकल्पना आमच्या सर्व गटाच्या सदस्यांनी मांडली आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती संकल्पनेची अंमलबजावणी करत आहोत यापुढे आम्ही कायम गट शेतीच्या माध्यमातून एकत्र राहून काम करणार आहोत

छत्रपती शेतकरी गट अध्यक्ष अरुण गायकवाड

Post Views: 22

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.